Cattle Smuggling संजय तुमराम
महाराष्ट्र

Cattle Smuggling: जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

यावेळी पाच तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातून ४८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत.

संजय तुमराम

चंद्रपूर- तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कत्तलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर पोलिसांच्या (Chandrapur Police)स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातून येणारी दोन वाहने मुल तालुक्यातील टेकाडी गावाजवळ जप्त करण्यात आली. यावेळी पाच तस्करांना (Smuggling) ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातून ४८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे मोठ्या प्रमाणात नेण्यात येतात. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाराचाकी वाहनात जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते.

हे देखील पहा -

जनावरांची तस्करी करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. याबाबतच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. नांदेड- सांगली- तेलंगणा- बिहार राज्यातील एकूण 5 आरोपींचा तस्करीत समावेश आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश कोणता? जाणून घ्या सविस्तर रंजक माहिती

Maharashtra Live News Update: दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यास सुरुवात, ६ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना मुदत

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

SCROLL FOR NEXT