दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव  Saam Tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा मांजराने घेतला जीव

कपाटावर चढलेल्या मांजराने विषचा डबा खाली पाडला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोमवारी दुपारच्या सुमारास अजय पाटील घराबाहेर होते तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. दीड वर्षांचा त्यांचा मुलगा रियांश घरात खेळत होता. कपाटावर चढलेल्या मांजराने विषाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या रियांशने विषाने माखलेले तेच हात तोंडात घातले.

काही वेळाने रियांशची आई घरात आली. तिने चिमुकल्याला उचलून त्याचे हात धुतले. आंघोळही घालून दिली. मात्र, काही वेळानंतर विषाने आपला प्रभाव दाखवला. चिमुकल्याची प्रकृती बिघडल्याने प्रारंभी त्याला खासगी आणि नंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास या चिमुकल्याचा मृत्यू झाला.समतानगर परिसरात या धक्कादायक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT