Raigad News : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडेलवाइस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचे नावे देखील समोर आली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
आरोपींमध्ये एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे स्मित शहा, केऊर मेहता, आर के बन्सल आणि कोर्टाने दोनही पार्टीमध्ये चर्चा करून कर्जाचा विषय सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या जितेंद्र कोठारी यांचाही समावेश आहे. रायगड पोलीस लवकरच सर्वांना समन्स देऊन चौकशीला बोलावणार आहेत. (Latest News)
कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत-खालापूरजवळील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज असल्याची बाब समोर आली होती. त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू होती.
कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 306, 34 अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नितीन देसाई प्रकरणात आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच एडलवाइज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यात कंपनीने सगळ्या बाजूंची सखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.