Kalyan Crime News : शेयर मार्केटमधून बक्कळ पैसे कमावून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा, फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime News : दर्शन परांजपे याच्या विरोधात आत्तापर्यंत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Kalyan Crime News : शेयर मार्केटमधून बक्कळ पैसे कमावून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा,  फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan News : शेयरमार्केटमधील गुंतवणुकीवर ८० टक्के व्याजाचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणारा भामटा दर्शन परांजपे याला शिर्डी येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कल्याण बाजारपेठ पोलिसांचे एक पथक नाशिकहून परांजपेला कल्याणला आणले आहे. दर्शन परांजपे याच्या विरोधात आत्तापर्यंत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही फसवणूक २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कल्याणमधील पारनाका परिसरात राहणाऱ्या दर्शन परांजपे याने अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात ८० टक्के व्याज देतो असे सांगितले होते. या अमिषाला बळी पडत कल्याणमधील अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र त्यांना मूळ रक्कम आणि व्याज न मिळाल्याने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाले. (Latest News Update)

Kalyan Crime News : शेयर मार्केटमधून बक्कळ पैसे कमावून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा,  फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Solapur Girl Missing : माळशिरसमध्ये पहिलीत शिकणारी मुलगी शाळेतून गायब; पालकांमध्ये खळखळ

मी पैसे कुठून देऊ अशा बतावण्या केल्या. हे ऐकताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. लोकांनी आयुष्यभराची पुंजी दर्शनकडे दिली होती. या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यात दर्शनच्या विरोधात तब्बल ९.३० कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच दर्शन पसार झाला. (Maharashtra News)

कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनचा शोध सुरु करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत होते. बाजारपेठ पोलिसांना शुक्रवारी नाशिकच्या शिर्डी पोलिसानी दर्शनला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

Kalyan Crime News : शेयर मार्केटमधून बक्कळ पैसे कमावून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा,  फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Rahul Gandhi PC : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नाशिकच्या दिशेने रवाना झाले. बाजारपेठ पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले आहे. पुढील प्रक्रिया करुन पोलिस त्याला घेऊन कल्याणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दर्शन कुठे लपला होता. त्याला पोलिसांनी कसे ताब्यात घेतले. त्याने अन्य किती लोकांना असा गंडा घातला आहे. याचा तपास बाजारपेठ पोलिस शनिवारी करणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com