doctor, nashik, mangrul , chandwad
doctor, nashik, mangrul , chandwad saam tv
महाराष्ट्र

Chandwad : विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल

साम न्यूज नेटवर्क

- अजय साेनवणे

Nashik News : विवाहतेच्या मृत्यू प्रकरणी पाेलीसांनी (police) नाशिक (nashik) जिल्ह्यात चार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचा आणि त्यामुळे विवाहतेचा मृत्यू झाल्याचा आराेप नातेवाईकांनी डाॅक्टरांवर (doctor) केला हाेता. (nashik latest marathi news)

नाशिक येथील चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका निर्भवने या विवाहित महिलेची गेल्या महिन्यात प्रसुती झाली. त्यावेळी प्रियंका यांस मुल झाले. मात्र त्यावेळी चुकीची शस्त्रक्रिया स्थानिक डॉक्टरांनी केल्यामुळे महिना भरानंतर तिचा मृत्यू झाला असा आराेप करीत तिच्या नातेवाईकांनी केला.

नातेवाईकांनी थेट रुग्णवाहिका चांदवड पोलीस स्थानकात आणली. यावेळी नातेवाईंनी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांना जो पर्यंत अटक करत नाही तो पर्यंत मृतदेह येथून घेऊन जाणार नसल्याचा पवित्र घेतला. तसेच पोलीस स्थानकात ठाण मांडले हाेते.

यानंतर रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातून अहवाल आल्यावर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात चार डॉक्टरांवर चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलाचे मित्रांसोबत समलैंगिक संबंध; वडिलांनी नको त्या अवस्थेत बघितलं; नंतर घडलं भयंकर

Devendra Fadnvis News | बैल आणि बोटं, पालघरमध्ये फडणवीस आणि ठाकूर आमनेसामने

Diabetes Control Tips: रोजच्या 'या' सवयी बदला मधुमेहावर राहील नियंत्रण

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

SCROLL FOR NEXT