Akola Sajid Khan Pathan Saam TV
महाराष्ट्र

Akola News: काँग्रेसचा बडा नेता गोत्यात, अकोल्यात गुन्हा दाखल; प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Akola Politics News: काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी मौलवी यांना फोन करून तुम्ही प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे अपील का केले? या कारणावरून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.

Satish Daud

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर अकोल्यात वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. ही ऑडिओ क्लीप काँग्रेस नेते साजिद खान यांची असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, यासाठी वंचितकडून आंदोलनही करण्यात आलं.

या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तक्रारीनंतर साजिद खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. साजिद खान पठाण विरोधात वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे.

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय आणि डाबकी रोड पोलिस ठाण्यात मोर्चा काढला. पोलिसांनी गांभीर्य पाहता तात्काळ साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.

काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी मौलवी यांना फोन करून तुम्ही प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे अपील का केले? या कारणावरून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.

तसेच प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरल्याचं वंचितच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे तसेच महानगरध्यक्ष गजानन गवई यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत.

अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत साजिद खान पठाण यांच्यावर विविध कलमान्वयेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, 'त्या' कथित ऑडिओ क्लिपवर साजिद खान पठाण म्हणतात की, वायरल ऑडिओ क्लिप आमची नाहीये.

आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम केल्या जात आहे. त्यामुळ कोणीही याकड़ं लक्ष देऊ नये, तर मौलवी यांनी सुद्धा साजिद खान पठाण यांच्याकडून धमक्या आणि शिवीगाळ झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

साजिद खान पठाण नेमके कोण?

काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक, अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता राहिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी झाली होती. अवघ्या २ हजार ६६२ मतांनी साजिद खान पराभूत झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT