Crime News Saam TV
महाराष्ट्र

मरीन ड्राईव्हवर राडा; काँग्रेस पदाधिका-यास महिलांनी चोपलं, अश्लील कमेंट भाेवली

त्याचे व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर फिरू लागले आहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : सोलापुरातील (solapur) बार्शी (barshi) तालुक्यातील एका महिलेस महिला दिनी (womens day) फेसबुकवर अश्लील कमेंट करणं बार्शीच्या तालुकाध्यक्षाला चांगलंच महागात पडलं आहे. बार्शी काँग्रेसचे (congress) तालुकाध्यक्ष जीवनदत्त अरगडे यांनी संजीवनी बारंगुळे या अपंग सामाजिक कार्यकर्तीस महिला दिनी फेसबुकवर अश्लील भाषेत कमेंट केली केली होती. त्याविषयी आरगडे यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (barshi latest crime news)

पोलीस आरगडेचा शोध घेत होते. दरम्यान आरगडे हा मुंबईत (mumbai) असल्याची बातमी बारंगुळे यांना मिळाली. बारंगुळे या स्वतः काही महिलांसोबत मुंबईत दाखल झाल्या. त्यांनी मरीन ड्राईव्हवरच आरगडेला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान जीवनदत्त आरगडे याने मुंबईतही या महिलांना शिविगाळ केल्याने त्याच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सारिका गटकुळ (पोलीस उपनिरीक्षक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

SCROLL FOR NEXT