Mahila Talathi Demand Bribe Saam Tv
महाराष्ट्र

Talathi Demand Bribe: परभणीत ACBची मोठी कारवाई; 20 हजारांची लाच मागणार्‍या महिला तलाठीविरोधात गुन्हा दाखल

महिला तलाठीविरुद्ध नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश काटकर

Parbhani News: सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करून फेरफार करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या रुमणा सज्जाच्या तलाठी शिल्पा किशनराव घाटोळ लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात आडकल्या आहेत. त्यांच्या विरुध्द नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

लाचलुचपत विभागाला मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिल्पा घाटोळ यांनी 20 हजाराची लाच (Bribe) पंचासमक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलीस उप अधिक्षक किरण बिडवे, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे पोह. चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह. मिलिंद हनुमंते, पोशि मुक्तार शेख, पौह जनार्धन कदम यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला. (Parbhani News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारच्या आईस न्यायालयाच्या आदेशाने वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मिळाला होता. त्या जमीनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करुन फेरफार घेण्यासाठी तक्रारदाराने गंगाखेड तालुक्यातील रुमणा सज्जाचे तलाठी शिल्पा घाटोळ यांच्याशी संपर्क साधला.

मात्र तलाठी घाटोळ यांनी पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली होती. पैश्याची मागणी केल्याची तक्रार 21 मार्च रोजी लाचलुचपत विभागाला मिळाली होती, तक्रारीची पडताळणी केली असता 20 हजाराची लाच घेतल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले. त्यानंतर शिल्पा घाटोळ यांच्यावर परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आह़े.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT