Maharashtra Police, Parbhani . Bribe , Palam Police Station SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Police : २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एसीबीला तपासात पोलिस कर्मचा-याने लाचेची मागणी केल्याचे समाेर आलं.

राजेश काटकर

Parbhani News : परभणी जिल्ह्यात 25 हजार रुपयांची लाच (bribe) मागितल्या प्रकरणी एका पाेलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

पालम पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक नामदेव उमाजी राठोड यांनी मारहाणीच्या गुन्हात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांना तपासात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबत परभणी येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. (Parbhani Latest Marathi News)

एसीबीच्या पथकानं तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचला गेला. दरम्यान कारवाईच्या वेळेला लोकसेवक पोलिस कर्मचारी यास संशय आला. त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. दरम्यान तपासात पोलिस कर्मचा-याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विराेधात पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एसीबीच्या अधिका-यांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: दिशाचा हॉटनेस पाहून म्हणाल, आला थंडीचा महिना, झटपट...

MLA Sanjay Shirsat : मुख्यमंत्री शिंदेच होणार? संजय शिरसाट यांचा मोठा खुलासा

Gold Price Today: सुवर्णसंधी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; एक तोळा सोन्याचा भाव काय?

Maharashtra News Live Updates: माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Badshah : रॅपर बादशाहच्या क्लबजवळ झाला मोठा स्फोट, हल्लेखोर बाईकवरुन आले अन्...; पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT