shivsena & bjp saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg: सेना आमदार वैभव नाईकांसह काँग्रेस, भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान लोकांचा जमाव करून कोवीड प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याने तसेच जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress) व भाजपच्या (bjp) पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ (kudal) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (sindhudurg latest marathi news)

शिवसेना आमदार वैभव नाईक (vaibhav naik), जिल्हाप्रमुख संजय पडते, शहर प्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्या प्रसाद बांदेकर, भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, आबा धडाम यांच्यासह अन्य ४० ते ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅली काढल्याने विद्यमान पदाधिका-यांवर गुन्हा दाखल

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी नंतर विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आफ्रीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट तसेच इतर नगरसेवकांवर देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT