Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

Shinde Sena leader booked for obstructing government work : अमरावतीतील विधान परिषद निवडणुकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

अमर घटारे, अमरावती प्रतिनिधी

Amravati MLC Election News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावतीमधील दिग्गज नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी बाजोरिया पिता-पुत्राने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं होतं? शिंदेंच्या नेत्यावर गुन्हा का दाखल झाला? पाहा सविस्तर...

शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, बाजोरिया पिता-पुत्रावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाजोरिया पिता-पुत्राने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता. विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्यानंतर, संतप्त झालेल्या पिता-पुत्राने जिल्हाधिकारी कार्यालयातच गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली धमकी?

निवडणूक अर्जांची छाननी आणि आक्षेपांवरील सुनावणीदरम्यान विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी असभ्य वर्तन केले. बाजोरिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना धमकीवजा शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाजोरिया यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

अर्ज बाद झाल्यानंतर 'हायव्होल्टेज ड्रामा'

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर बाजोरिया पिता-पुत्राने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमरावतीत विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर तिथे मोठा 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला. विप्लव बाजोरिया हे महायुतीचे बंडखोर उमेदवार होते. त्यांच्या शपथपत्रावर (Affidavit) छाननी प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेण्यात आल्याने, त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेशाची प्रत (Order Copy) देताच, "मी हायकोर्टात जाऊन माझा उमेदवारी अर्ज वैध ठरवून आणणार," असे वक्तव्य विप्लव बाजोरिया यांनी केले.

भाजपचा जीव भांड्यात पडला!

विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये अमरावतीची जागा भाजपला सुटली होती. मात्र, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे नेते विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विप्लव बाजोरिया यांच्या या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी कमालीची वाढली होती. पण आता विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजपने मोकळा श्वास घेतला आहे. असे असले तरी, अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्र कमालीचे आक्रमक झाले आहेत.

जिल्हाधिकारी पक्षपातीपणे वागले; बाजोरियांचा गंभीर आरोप

"आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर वेळेत देण्यात आली नाही," असा थेट आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे. "आम्हाला ऑर्डरची कॉपी न देताच जिल्हाधिकारी पार्टीला निघून गेले. त्यांनी पक्षपातीपणा करून आमचा फॉर्म रद्द केला आहे. आमची सुनावणी केवळ १५ मिनिटे घेण्यात आली, तर विरोधकांची सुनावणी ७ ते ८ तास चालली," असा गंभीर आरोप गोपीकिशन बाजोरिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IED Blast: आसाम रायफल्सच्या वाहनामध्ये मोठा स्फोट; एक जवान शहीद, चार जण जखमी

Tuesday Today : धनलक्ष्मीची कृपा राहील; 5 राशींच्या व्यक्तींच्या नोकरीत बदल होणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

मुंबईत हृदयद्रावक घटना! 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला, शोधमोहीम सुरू|VIDEO

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT