बीडच्या आष्टीत भाजप आमदार सुरेश धसांवर गुन्हा दाखल... विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या आष्टीत भाजप आमदार सुरेश धसांवर गुन्हा दाखल

बीड आष्टीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर, nkm राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे घर पाडल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी मनोज चौधरी यांच्या फिर्यादीवरून सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर रात्री एक वाजता, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे
बीड : बीड आष्टीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर,nkm राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे घर पाडल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी मनोज चौधरी यांच्या फिर्यादीवरून सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर रात्री एक वाजता, हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आष्टीपासून जवळच असणाऱ्या पांढरी गावात, बीड- अहमदनगर हायवे लगत, आमचं घर आहे. या घराशेजारीच हॉटेलचं काम सुरू होतं. या सर्व जागेचे कागदपत्र क्लिअर आहेत. मात्र सुरेश धस यांच्या विरोधात माझ्या पतीने, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. याचाचं राग मनात धरून त्यांनी, आम्ही आष्टी येथे गेलो असता, आमचे घर जेसीबी पोकलेनच्या माध्यमातून पाडले आहे.

याची माहिती आम्हाला समजल्यास, आम्ही घराकडे आलो. मात्र या दरम्यान आम्हाला देखील धारदार शास्त्राच्या माध्यमातून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे आम्ही तिथून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये, कलम 143,147,148,149,427,336,379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आमदार सुरेश धस यांना अटक केली नाही, तर मी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या बंगल्यासमोर रॉकेल ओतून घेणार आहे. असा इशारा मनोज चौधरी यांनी दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले? अजित पवारांनाही सीएमपदाची संधी मिळणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? पाहा व्हिडिओ

World Travel : स्वर्गाहून सुंदर जगातील 'हे' ठिकाण, आयुष्यात एकदा भेट द्याच

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली; वाहन अक्षरश: चक्काचूर, दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT