Satara News Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News: उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Case filed Against 45 People Including Udayanraje: सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

Satara News: सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापुर्वी काही ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या घटनास्थळी पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. या घटनेच्या वेळीस खासदार उदयनराजे भाेसले हे देखील घटनास्थळी पाेहचले. या घटनेमुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात आगामी काळात खडाजंगी हाेण्याची चिन्ह निर्माण झालीत. (Maharashtra News)

त्यातच आता उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सातारा (Satara) शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचे समर्थक विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे तक्ररीत म्हटलंय. दरम्यान, संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

फिर्यादीत म्हटलं आहे, की खासदार उदयनराजे भोसले, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, सतीश माने, अर्चना देशमुख, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ ऊर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसळ, राहुल गायकवाड, सुभाष मगर, रंजना रावत, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण.

तसेच रोहित लाड, युनूस झेंडे, नंदकुमार नलवडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, शेखर चव्हाण, गीतांजली कदम, अश्‍विनी गुरव, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर जाधव,सौरभ सुपेकर, प्रवीण धसके यांच्यासह १० ते १५ जण हे बाजार समितीच्या नियोजित बांधकामाच्या ठिकाणी आले. पोलीस असतानाही त्यांनी विकासाच्या कामास विरोध केला.

कायदेशीर बाजू समजावून सांगूनही उदयनराजे यांनी या जागेत पाय ठेवल्यास खल्लास करीन, अशी धमकी दिली, तसेच विकासासाठी ठेवलेला लोखंडी कंटेनर पोकलेनच्या साह्याने तोडफोड करून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. विकासाचे काम करून दिले नाही, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असेही विक्रम पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT