Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

बॅक ऑफ महाराष्ट्रात अपहार; बॅंक मॅनेजरसह २५ कर्जदारांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार केली होती.

भारत नागणे

पंढरपूर - सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील श्रीपूर येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेतून काही शेतकऱ्यांच्या नावे बोगस ठिबक सिंचन कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. तक्रारीनंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली.

हे देखील पाहा -

या चौकशीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन मॅनेजर एस जाफर एस.आर. अहमद यांच्यासह 25 कर्जदारांवर 92 लाख 60 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या नावे बोगस ठिबक सिंचनाची व पीक कर्जे काढून ती रक्कम बँक मॅनेजरने परस्पर हडप केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बँकेकडे केली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन बँकेने तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये बँकेचे तत्कालीन मॅनेजर जाफर एस. आर. अहमद यांनी 2013 ते 2018 या काळामध्ये पंचवीस शेतकऱ्यांच्या नावे 92 लाख 60 हजार रुपयांची बोगस कर्जे काढून ती रक्कम स्वतः घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर बँकेचे अधिकारी दत्तात्रय मधुकर कावेरी यांनी बँकेचे तत्कालीन मॅनेजर जाफर एस.आर. अहमद यांच्यासह इतर 25 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT