kolhapur Crime संभाजी थोरात
महाराष्ट्र

शेतजमीनिच्या वादातून भाच्यास बेदम मारहाण; वाचवायला गेलेल्या मामाची निर्घृण हत्या

शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरुन आवळीपैकी (aavli) पोवारवाडी येथे झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाची हत्या (killing) करण्यात आली

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: शासनाकडून मिळालेल्या शेतजमिनीच्या पैशाच्या वाटणीवरुन आवळीपैकी (aavli) पोवारवाडी येथे झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाचा खून (killing) झाला आहे. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय- ७०) आवळी पैकी पोवारवाडी ता.पन्हाळा असे मृत मामाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी (Accused) प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघेजण, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) या चौघांना कोडोली पोलीसांनी (police) अटक (Arrested) करण्यात आली आहे. या खूनाने परिसरात खळबळ उडाली आहे. (case aavali panhala one person killing disputes land topic kolhapur)

हे देखील पहा-

पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी की, भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रविण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील हे एकाच गावात असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर– रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले १५ दिवसापासून वाद सुरु होता. रविवारी भगवान पाटील हे रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली.

हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडवण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा प्रतिकलाही दगडाने मारहाण केली आहे. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women's WC: भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पाऊस आला तर...! कोणत्या टीमला मिळणार सेमीफायनलचं तिकीट? पाहा समीकरण

HSRP Number Plate: अजूनही वेळ गेलेली नाही, एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; अन्यथा ₹१०००० दंड भरावाच लागणार, वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले ब्रिजजवळ दोन कार आणि ट्रकचा भीषण अपघात

Rice Papad Recipe: जेवणासोबत काहीतरी चटपटीत खायचय? घरीच बनवा कुरकुरीत तांदळाचे पापड

Crime : नागपूर हादरले! २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकीची हत्या, मेकॅनिक नवऱ्याने डोकं फोडलं

SCROLL FOR NEXT