Nanded Accident Saam TV
महाराष्ट्र

Nanded: कार-ट्रकची समोरासमोर धडक; कारचा चक्काचूर, एकाच कुटूंबातील ४ जणांचा मृत्यू

नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे मृत कुटुंबातील पाच सदस्य जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड - हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की अपघातात कारता चक्काचूर झाला आहे. नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे मृत कुटुंबातील पाच सदस्य जात होते त्यावेळी देगलूरकडून येणाऱ्या ट्रकची आणि यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. (Nanded - Hyderabad Highway)

या अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा-मुलगी असे चार जण जागीच ठार झालेत. मात्र, त्याच कारमध्ये असणारी नात सुदैवाने बचावली असली तरी ती देखील गंभीर जखमी आहे.

हे देखील पाहा -

सदर अपघात काल रात्री आठच्या सुमारास नांदेड जिल्ह्य़ातील (Nanded District) नायगाव तालुक्यातील कुंचेली फाटा इथं झाला. त्यामध्ये शंकरराव जाधव, महानंदा जाधव, धनराज जाधव आणि कल्पना शिंदे असे एकाच कुटुंबातील मृत्यूमुखी पडलेल्या सदस्यांची नावं आहेत. तर नात स्वाती पाटील ही गंभीर जखमी असून तीच्यावर नांदेड च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातस्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर अपघातामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली होती. शिवाय या एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातल्याने केरूर आणि तमा टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT