शहानूर नदीपात्रात पडली कार, घातपाताचा संशय; रेस्क्यू ऑपरेशन सुरु... अरुण जोशी
महाराष्ट्र

शहानूर नदीपात्रात पडली कार, घातपाताचा संशय; रेस्क्यू ऑपरेशन सुरु...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शहानूर नदीपात्रात एक कार पडल्याचे आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले.

अरुण जोशी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शहानूर नदीपात्रात एक कार पडल्याचे आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. यावरून तातडीने महसूल विभाग व येवदा पोलिस घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. (Car falls into Shahanur river basin, suspicion of assault; Rescue operation begins)

हे देखील पहा -

दर्यापूर तालुक्यातील भामोद या गावाच्या महामार्गावरून तब्बल २०० मीटर अंतरावर शहानूर नदी वाहते. महामार्गावरून शहानूर नदीपात्रात जाण्याकरिता शेतशिवार व चिखल तुडवित जावे लागते, अशा स्थितीत सदर कार शहानूर नदीपात्रात उलटी पडल्याचे निदर्शनास आल्याने हा अपघात आहे की घातपात, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आज सकाळी शेतशिवारात जाणाऱ्या काही लोकांना नदीपात्रात उलटी कार पडल्याचे दिसून आले. नदीला भरपूर पाणी असल्यामुळे कारचे केवळ टायर हे पाण्यावर तरंगत असल्याचे दिसत आहेत. तहसीलदारांसह महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी रवाना झालेत. कार कोणाची व कारमध्ये कोण आहेत याची माहिती मिळू शकली नाही. महसूल विभागाने रेस्क्यू टीमला तातडीने हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सद्यस्थितीत रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली नाही. सदर कार पाण्यामध्ये उलटी पडून असल्यामुळे कारमध्ये कोणी आहे किंवा नाही, या संबंधात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार अपघात सकाळी पहाटे घडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र रेस्क्यू टीम आल्याशिवाय यासंबंधात कोणतीही पुष्टी करता येणार नाही. तहसीलदार योगेश देशमुख, तहसीलदार गाडेकर, येवदा पोलिस ठाणेदार अमोल बच्छाव, भामोदचे तलाठी व सरपंच आदी घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑपरेशन रेस्क्यू टीम आल्यानंतर गाडी बाहेर काढण्याचे रेस्क्यु सुरु झाले सध्या त्यात १ व्यक्ती आढळून आला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT