car accident at yavateshwar ghat kass road near satara  saam tv
महाराष्ट्र

Satara Kass Road : यवतेश्वर घाटात घडली थरकाप उडवणारी घटना, पाेलिस तपास सुरु

सातारा तालुका पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

ओंकार कदम

Satara News :

सातारा शहरातून कास रस्त्याकडे (kass road) जाणा-या यवतेश्वर घाटात (yavateshwar ghat) एका चार चाकीचा अपघात झाला. या अपघातानंतर प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनूसार पाेलिसांनी चालकावर वेगात वाहन चावल्या प्रकरणी सातारा तालुका पाेलिस ठाण्यात (satara police) गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार यवतेश्वर घाटातून कासकडून साता-याकडे एका चार चाकी भरधाव वेगानं निघाली हाेती. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन कडठ्यावर जाऊन आदळले. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Maharashtra News)

दरम्यान कठड्यावर वाहन आदळल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. वाहन चालक अपघातानंतर न थांबता निघून गेल्याने नेमकं या अपघातात कोण, किती जखमी झाले हे समजू शकले नाही. भरधाव वेगाने गाडी चालवल्या प्रकरणी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल हाेत आहे. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने अनेक जण एकमेकांना या अपघाताचा व्हिडिओ पाठवत गाडी हळू चालवा रे... असा सल्ला देताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT