nanded accident update saam tv
महाराष्ट्र

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाला मृत्यूनं गाठलं, दोघांचा जगीच मृत्यू, आठ जखमी

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला, कारण...

साम टिव्ही ब्युरो

संतोष जोशी

नांदेड : नांदेड - हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात (Nanded Accident) झाल्याची धक्कादायक घटना आज घ़डली. नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. हैद्राबाद महामार्गावरून जात असताना अचानक क्रुझर जिपचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात (two people died) दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. देगलूर तालुक्यातील देगाव येथील शेख कुटुंब नांदेड येथे जात असताना होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताची माहिती मिळताच कुंटुर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील देगाव येथील शेख कुटुंब कारमधून नांदेड येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. कृष्णूर एमआयडीसी जवळ कारचा टायर अचानक फुटल्याने कार रस्त्यावरून उलटली. जवळपास १५ प्रवासी या जिपमध्ये होते. हा भीषण अपघात आज दुपारी साडेचारच्या सुमारास नांदेड - हैदराबाद महामार्गावर झाला. या अपघातात एक महिलेसह एकाचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खा, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे!

Calcium Rich Foods : दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देतात 'हे' ५ पदार्थ, हाडं बनतील लोखंडासारखी मजबूत

Nepal Flood: नेपाळमध्ये महापूरामुळे विध्वंस! ६१६ जणांचा मृत्यू, २५०० जण वाहून गेले; ३२० भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT