Rupali Chakankar’s social media post triggers fresh political debate amid rising resignation demands. saam tv
महाराष्ट्र

CMOकडून राजीनाम्याचे निर्देश येताच रुपाली चाकणकरांची सोशल मीडियावर पोस्ट; राजकीय वर्तुळात खळबळ

Rupali Chakankar Social Media Post: राजीनाम्याच्या मागणीदरम्यान रूपाली चाकणकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. व्हायरल झालेल्या फोटोसंबंधित वादावरून चाकणकर टीकेच्या धनी बनत आहेत.

Bharat Jadhav

  • रुपाली चाकणकर यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढली

  • सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

  • व्हायरल व्हिडिओमुळे वाद तीव्र

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणानं नाशिकसह संपूर्ण राज्य हादरलं. खरात यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही सोबतचे काही फोटो व्हायरल झालेत. तसेच खरात यांच्या एका संस्थेच्या ट्रस्टशी नाव जोडले गेल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधकांसह पक्षातील महिला नेत्यांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या दरम्यान रुपाली चाकणकर यांनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच रुपाली चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याआधी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. चाकणकर यांच्या राजीनामा घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून चाकणकरांनी राजीनामा द्यावा असे निर्देश देण्यात आलेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले, त्याचवेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतल्याचं सांगितलंय. यासह अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर आणा असा निवेदन पत्र त्यांनी राज्य महिला आयोगाच्या वतीने दिले आहे.

काय आहे पोस्ट

आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली. खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव जोडले जात आहे, त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात डिझेल टंचाईमुळे टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आर्थिक संकटात

Insomnia Relief: रात्री झोप येईना? 'या' ५ चुका टाळा मग येईल गाढ झोप

IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

Political News: बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT