Eknath Shinde Latest news
Eknath Shinde Latest news SaaM Tv
महाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुंबईकडे? गुवाहाटीतून विमानतळाच्या दिशेने रवाना

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आताची सर्वात मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे गुवाहाटी विमानतळाकडे रवाना झाल्याची माहिती आहे. शिंदे (eknath shinde) हे हॉटेलबाहेर एकटेच पडले आहे. त्यांच्यासोबत असलेले इतर आमदार हे हॉटेलमध्येच आहे. त्यामुळे शिंदे नेमके कुठे गेले याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदेतज्ज्ञांकडे गेलेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे आज दुपारनंतर ते मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest News)

विशेष बाब म्हणजे शिवसेनेने बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी कायद्याचा अधिकार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या 17 आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यांकडे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

शिवसेनेनं कायद्याचा अधिकार घेतल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या गटासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी फेटाळून लावला आहे. झिरवळ यांनी गटनेता पदावर शिवसेनेचे अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता दिली आहे. (Eknath Shinde Marathi News)

दरम्यान, शिवसेनेनं कायद्याचा अधिकार घेतल्याने एकनाथ शिंदे हे आता नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अशावेळी गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये आमदारांसह थांबलेले एकनाथ शिंदे हे हॉटेलमधून एकटेच बाहेर पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता गुवाहाटीतून थेट मुंबईच्या दिशेने येणार की, दुसरीकडे जाणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT