shinde government news
shinde government news  saam tv
महाराष्ट्र

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Cabinet Expansion News: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हलचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विस्तार करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Latest Maharashtra Politics News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशात उद्या (रविवारी) ते कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर या हालचाली वाढल्याचं दिसत आहे.

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. शुक्रवारी ते नागपुरात दाखल झाले. त्यानंतर आज शनिवारी १०.३० वाजता त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. दुपारी अमित शहा पुण्यात दाखल होणार आहेत. पुण्यात आल्यावर ते संघाच्या रेशीमबागेत भेट देणार आहेत. तसेच उद्या ते कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता येत्या एक दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या जातील, असं उद्धव ठाकरेंनी काल माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं. त्यामुळे रविवारी अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत आगामी निवडणूकांबाबतही चर्चा केली जाणार, अशी माहिती साम टिव्हीला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आगामी पालिकेच्या निवडणूका लागल्यास ठाकरे गटाला यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन कैलाश कुमार नामक व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. आज दुपारपर्यंत समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT