Pravin Darekar : प्रवीण दरेकरांचं सहकार चळवळीवर मोठं विधान; म्हणाले, शरद पवार आणि अमित शहा...

सहकार चळवळीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे
Pravin Darekar News
Pravin Darekar News Saam tv

Pravin Darekar News : पुण्यात सकाळ माध्यम समुहाकडून सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या महापरिषदेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अडचणींवर चर्चा होत आहे. तसेच या महापरिषदेत सहकार चळवळीवर देखील चर्चा झाली. या महापरिषदेत सहकार चळवळीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सहकार चळवळीला शरद पवार आणि अमित शहा यांच्या चर्चेतून दिशा मिळेल, असं लक्षवेधी विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

प्रवीण दरेकर म्हणाले, 'सहकारी बँकेसमोर अनेक अडचणी उभा ठाकल्या आहेत. बँका अडचणीत असल्याने सरकारने निधी द्यायल हवा. त्यामुळे बुडणाऱ्या बँका सुस्थितीत येऊ शकतात'.

Pravin Darekar News
Sharad Pawar : 'साखरेला वगळता शेतीचा विचार करणे अशक्य'; वाचा शरद पवारांनी सांगितलेला साखर उद्योगाचा इतिहास...

'सहकार बँकाची आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. आता काही बँका व्यक्तिगत ताकदीवर पुढे जात आहे. पण तरीही त्यांच्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे या बँकांनी एकत्र पुढे जायला हवे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार खातं निर्माण केलं. यामुळे सहकार क्षेत्राला महत्व आलं आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्र सक्षम करण्याची आवश्यकता आहे', असे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.

Pravin Darekar News
Sanjay Shirsat : पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यात राऊतांचा मोठा वाटा; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट

'सहकार चळवळीला शरद पवार (Sharad Pawar) यांचा आश्रय आणि योगदान राहिलं आहे. सहकाराला त्यांचा आश्रय आणि आशीर्वाद ते देत असतात. शरद पवार यांना या क्षेत्रातील बारकावे माहीत आहेत. मी स्वत: ७० ते ८० सहकारी बँकाचा आढावा घेतला आहे. प्रत्येक बँकेला अर्धा तास देऊन समजून घेत आहे. याबाबत लवकरच राज्य सरकारला निवेदन देऊ. तर सहकार क्षेत्राची अमित शहा यांना जाण आहे.त्यामुळे याची सुरुवात ही शरद पवार आणि शेवट अमित शहा यांच्या चर्चेत दिशा मिळेल. सहकार क्षेत्रात अडचणी आहेत, त्याला उर्जितावस्था देण्याची गरज आहे', असे दरेकर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com