Sharad Pawar : 'साखरेला वगळता शेतीचा विचार करणे अशक्य'; वाचा शरद पवारांनी सांगितलेला साखर उद्योगाचा इतिहास...

UP मध्ये मी बंद पडलेले कारखाने बघायला गेलो होतो, असं पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत विविध सहकारी वित्तसंस्थांनी मोलाची भूमिका निभावली आहे. आजही ही परंपरा समृद्ध करण्याचं काम सहकारी वित्तसंस्था करत आहेत. त्यांचा हा प्रवास सुकर करण्यासाठी, त्यांच्यासमोरचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आणि आव्हानांचं संधीत रुपांतर करण्यासाठी, आज सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ महाकॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे.(Latest Sharad Pawar News)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा इतिहास आणि प. महाराष्ट्रात साखर व्यवसाय नेमका कसा उभारला गेला याविषयी पवारांनी माहिती दिली.

Sharad Pawar
Sharad Pawar : 'ते असं बोलतील वाटलं नव्हतं', फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी गौप्यस्फोटावर शरद पवारांची प्रतिक्रिया

साखरेला वगळता शेतीचा विचार करणे अशक्य

'UP मध्ये मी बंद पडलेले कारखाने बघायला गेलो होतो. तिथे ओओएस पीक घ्यायला सुरुवात झाली होती. या उद्योगाला सुरुवात झाली ती १९३२ साली. सरकारने परदेशातून येणाऱ्या साखरेवर ड्यूटी बसवली आणि मग इथे कारखाने काढायला प्रोत्साहन मिळायला लागलं होतं. महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ ही खाजगी लोकांनी केली,असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Ajit Pawar : 'त्याविषयी मी काहीच बोलणार नाही', देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी बोलणं टाळलं

सहकारी आणि खाजगी कारखान्यांनी वीज निर्मितीमध्ये लक्ष घातले पाहिजे. विजेचा तुटवडा आहे. सहवीज निर्मितीचे २६ प्रकल्प तयार झाले आहेत. शासनाने विजेचे दर कमी केलेत. राज्य सरकारला याची आठवण करून देतो,असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.

आर्थिक व्यवस्थापन हा महत्वाचा प्रश्न

आज जी आव्हाने आहेत त्यात आर्थिक व्यवस्थापन हा महत्वाचा प्रश्न आहे. खर्च कमी होतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक व्यवस्थापन तांत्रिक स्टाफ याचं प्रशिक्षण आम्ही सुरू करतोय, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

साखर कारखानदारीला सुरूवात कशी झाली?

'कापडाचे व्यापारी असलेले वालचंद हिराचंद यांची इच्छा होती की, साखर उद्योगामध्ये जावं. आज ज्याला वालचंदनगर म्हणतात तिथे कळंब नावाचं गाव होतं. तिथं साखर कारखाना काढायचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. अशाप्रकारे एका नव्या क्षेत्राची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

'डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था सुरुवीतीली काढली होती. वसंतदादा यांनी ही जबाबदारी घेतली. त्यानंतर ही संस्था माझाकडे नेतृत्व आलं.तेव्हा मी नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाव दिलं, हे देखील शरद पवारांनी सांगितलं.

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर

महाराष्ट्राने देशात सर्वांत जास्त साखर तयार केली. महाराष्ट्राने उत्तर प्रदेश पेक्षा जास्त साखर तयार केली आहे. यंदा शेतकऱ्यांना जी किंमत दिली त्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. त्यामुळे सहकारी इतकीच खाजगी कारखान्यांची संख्या दिसते. ३३ बजार २४४ कोटी शेतकऱ्यांसाठी आले होते. त्यातील ३३ हजार ७७ कोटींचे वाटप आतापर्यंत झाले आहे, असं शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com