Eknath Khadse: म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार लांबतो आहे; आमदार एकनाथ खडसे यांचा सरकारवर निशाणा

म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार लांबतो आहे; आमदार एकनाथ खडसे यांचा सरकारवर निशाणा
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

अभिजीत देशमुख

कल्‍याण : सरकार स्थापन होवून सात महिने झाले. मात्र या कालावधीनंतर मंत्री मंडळ विस्तार झाला नाही. एकदा मंत्री मंडळाचा विस्तार झाला की आपोआप असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबतो आहे. असे (NCP) राष्‍ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कल्याणमध्ये बोलताना सांगितले. (Letest Marathi News)

Eknath Khadse
Jalgaon News: तीन वर्षात परिवार गमावला; मुलगी अन पतीपाठोपाठ मुलानेही सोडले प्राण

शिंदे– फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जातोय याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष केले. यावेळी बोलताना खडसे यांनी सांगितले, की १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होवू शकत नाही. जनसंपर्क कमी पडतोय. भाजपमधले अनेक आमदार व शिंदे गटातले सर्व आमदार मंत्री मंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला मंत्रिमंडळात घ्यावे; हा पेच असल्याने मंत्रिमंडळाचे विस्तार होत नाही.

Eknath Khadse
ATM Crime: एटीएम कार्डची आदलाबदल करून ९७ हजारांचा गंडा

त्‍या युतीबाबत अद्याप प्रस्ताव नाही

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली. मात्र याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलाही बोलन राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालेले नाही. तसा प्रस्ताव देखील आला नसल्याचे शरद पवार यांनी कालच सांगितलं आहे. प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील असे खडसे यांनी स्पष्ट केले.

सत्‍तेच्‍या लालसेपाटी सरकार स्‍थापन

‘सी’ सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्वे सत्य परिस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय घेतो यावर ते सरकार अवलंबून आहे. त्याची टांगती तलवार सरकारवर आहे. सरकार नावाला चालले असून सरकारमध्ये समन्वय नाही. मुळात राज्यात मविआ सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले. एका पक्षाला फोडणे पूर्ण पक्षाला एकत्र घेणे आणि त्या माध्यमातून हे सरकार स्थापन झाले असल्‍याचे खडसे यांनी सांगितले.

सरकारच्‍या विरोधात मतदान होईल

महाराष्ट्रावर ६ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा कर्ज आहे. यामधला सर्वात मोठा भाग ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज किंवा हमी या सात महिन्यांचा काळात दिली आहे. विविध विकास कामाबद्दल हे कर्ज किंवा हमी आहे. मात्र राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय की त्याला त्याचा फारसा काही लाभ होत नाही. त्यामुळे या सरकारचा विरोधात मतदान करेल अशा स्वरूपाचा संकेत या सी सर्वेच्या माध्यमातून दिला जातोय आणि मला वाटतं अलीकडचा कालखंडात राज्याची स्थिती आहे; त्याचे प्रतिबिंब या सर्वेत दिसतेय अशी प्रतिक्रिया दिली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com