Mhada Saam tv
महाराष्ट्र

म्हाडाचं घर घेताय? अर्ज करण्यापूर्वी ५ गोष्टी हमखास चेक करा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप

Dream Home with MHADA: म्हाडाचं घर घेताय? अर्ज भरण्यापूर्वी ५ गोष्टी तपासा. अन्यथा प्रवास अन् खर्च वाढू शकतो.

Bhagyashree Kamble

  • म्हाडाचं घर घेण्यापूर्वी ५ गोष्टी चेक करा.

  • प्रवास अन् खर्च वाढण्याची शक्यता.

  • नक्की काय - काय चेक करावं.

मुंबई पुण्यासारख्या प्राईम लोकेशनवर घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. परंतु, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे काही नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यसाठी म्हाडा कायम मदत करते. म्हाडाकडून नुकतंच राज्यातील विविध भागांत सोडत जाहीर करण्यात आलीय. लॉटरी लागावी म्हणून आपण फॉर्म भरतो आणि लॉटरी निघण्याची वाट बघतो. परंतु, म्हाडाचं घर घेण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

म्हाडाचं घर घेण्यापूर्वी आपण काही गोष्टी दुर्लक्षित करतो. यामुळे घर घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. म्हाडाचे घर घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल टाकावे. खासगी बिल्डरांच्या तुलनेत म्हाडाकडून स्वस्तात मस्त घर मिळते. सरकारी योजनेतून घर मिळत असल्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी असते. पण म्हाडाचं घर घेण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवा.

फ्लोअर प्लॅन

घर घेताना आपण चौरस फूट बघतो. पण तेवढंच पुरेसं नाही. फ्लोअर प्लॅन देखील तपासा. कधी कधी हॉल मोठा पण बेडरूम छोटा असतो. काही १ बीएचके घरांमध्ये बेडरूममध्ये टॉयलेट असते. यामुळे घरात प्रायव्हसी राहत नाही. टॉयलेट वेगळं किंवा पॅसेजमध्ये असणं उत्तम. या सर्व गोष्टी लक्षात घेत अर्ज भरा.

लोकेशन

म्हाडाचे घर घेताना फक्त किंमत किंवा एरिया बघू नका. लोकेशनही बघा. कारण स्टेशनपासून इमारत फार लांब असेल तर, आपला अतिरिक्त खर्च जास्त होऊ शकतो. ऑफिस, शाळा, मार्केट जवळ असल्यावर खर्च कमी होतो. तसेच वेळेचीही बचत होते. हळूहळू परिसरात विकास झाल्यावर घरांचीही किंमत वाढते.

साईट विजिट

म्हाडाचं घर घेताना फक्त वेबसाईटवरची माहिती किंवा कागदोपत्री डिटेल्सवर अवलंबून राहू नका. प्रोजेक्टला प्रत्यक्ष भेट द्या. बांधकामाची क्वालिटी, एरिया, लिफ्ट, पाणीपुरवठाह या सगळ्या गोष्टी पाहा.

एक्स्ट्रा अमाउंट

घर खरेदी करताना जाहिरातीत दिलेली किंमत पाहून निर्णय घेऊ नका. एक्स्ट्रा अमाउंटकडेही लक्ष द्या. रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी, मेटेंनन्स, पार्किंग फी, डेव्हलपमेंट चार्जेस अशा एक्स्ट्रा फीचा विचार करा. या खर्च दिसून येत नाही. इन्फ्रा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डर पैसे मागू शकतात. त्यामुळे जाहिरातीवर दिलेली किंमत पाहून घर खरेदी करू नका.

गाडी पार्किंग

म्हाडाकडून रिझर्व्ह पार्किंग मिळण्याची शक्यता कमी असते. जर आपल्याकडे टु व्हिलर किंवा फोर व्हिलर असेल तर, पार्किंग मिळत असलेला प्रोजेक्ट निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain: हार्ट अटॅक अन् जळजळ यातला फरक कसा ओळखायचा? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण लक्षणे

Long Sleeves Blouse Design: मॉडर्न अन् स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे 'फुल स्लिव्ह ब्लाऊज'

Shocking : अरे देवा! गाडीवरून आले, आजूबाजूला पाहिलं; नंतर हळूच सिलिंडर चोरून पळ काढला

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूरस्थिती हिंगणी हवेलीत नऊ नागरिक पाण्यात अडकले

savalyachi janu savali: मेहेंदळे कुटुंबाच्या व्यवसायातून तिलोत्तमा या व्यक्तीला करणार बेदखल? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT