Rahul Bajaj SaamTvNews
महाराष्ट्र

Rahul Bajaj : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन!

बजाज उद्योग समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

पुणे : बजाज उद्योग समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी तब्बल 5 दशके बजाज उद्योगसमूहाचे नेतृत्व केले. त्यांनी आज पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, त्यांच्यावर मागील 8 ते 10 दिवसांपासून उपचार सुरु होते. (Rahul Bajaj Passes Away)

राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले. 1965 पासून त्यांनी बजाज समूहात काम करण्यास सुरुवात केली होती. बजाज ऑटोला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

2008 मध्ये, त्यांनी बजाज कंपनीचे तीन भागात विभाजन केले. बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह असे ते विभाजन होते. मुलं राजीव बजाज आणि संजीव बजाज आता कंपनीचे दैनंदिन व्यवहार सांभाळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train weight distribution: अनेक टन वजन असलेल्या ट्रेन धावूनही रेल्वेचे रूळ तुटत कसे नाहीत?

Irregular meal timings: दररोज वेगवेगळ्या वेळेस जेवल्याने पोटावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

Bank Rules : बँकेच्या चेकवर 'Lakh' लिहायचं की 'Lac'? जाणून घ्या योग्य पद्धत नाहीतर व्हायचे लाखाचे हजार

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

SCROLL FOR NEXT