पोकलेन व्यावसायिकाला मारहाण करुन अपहरण; स्कॉर्पिओ दिली कालव्यात ढकलून Saam TV
महाराष्ट्र

पोकलेन व्यावसायिकाला अपहरण करुन मारहाण; स्कॉर्पिओ दिली कालव्यात ढकलून

लोक पाठलाग करत असल्याचे कळताच अपहरण करणाऱ्या चौघांनी कैलाश शिगंटे याला औरंगाबाद महामार्गावरील सौदलगाव फाट्यावर धावत्या कार मधून खाली फेकले.

लक्ष्मण सोळुंके

जालना: पोकलेन मशिन भाड्याने लावायचे म्हणून बीड जिल्ह्यातील मादरमोई येथील एकाचं अपहरण करून त्याला चालत्या गाडीतून फेकून दिल्याची घटना जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात घडली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) मादरमोई गावातील व्यावसायिक कैलास आसाराम शिगंटे या व्यवसायिकाला तुमचे पोकलेन आणि जेसीबी भाड्याने लावायचे म्हणत बोलावून त्यांच्या मोटार सायकलला धक्का मारून त्यांचा अपघात घडून त्यांना उपचरासाठी नेतो म्हणून स्कर्पिओ गाडीत डाबून त्याला सोलापूर -औरंगाबाद महामार्गावरील वडीगोद्री परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर मारहाण करत पैशाची मागणी केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

वडीगोद्री परिसरात स्कर्पिओ कार बंद पडल्याने अपहरण करत्या चौघांनी कार जायकवाडीच्या कालव्यात ढकलून दुसरी कार मागून औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने पळ काढला परिसरातील नागरिकांना या घटनेचा काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी या गाडीचा पाठलाग केला. लोक पाठलाग करत असल्याचे कळताच अपहरण करणाऱ्या चौघांनी कैलाश शिगंटे याला औरंगाबाद महामार्गावरील सौदलगाव फाट्यावर धावत्या कार मधून खाली ढकलून औरंगाबादच्या दिशेने पळ काढला उपस्थीत नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवताच गोंदी पोलिसांनी कैलास यांच्या फिर्यादीवरून अपहरण करत्या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करत हा गुन्हा बीड पोलिसांकडे वर्ग केला असून या प्रकरणी अधिक तपास बीड पोलिस करत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

SCROLL FOR NEXT