Scene from the Shirdi-bound bus accident on Kolhar-Ghoti highway where a private bus collided head-on with a truck carrying mangoes, resulting in 3 deaths and multiple injuries. Saam TV News
महाराष्ट्र

Bus Accident : पहाटे काळाचा घाला, शिर्डीकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू, ८ जखमी

Shirdi Bus Accident News Today : शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हार-घोटी रस्त्यावर अपघात. तीन ठार, आठ जखमी. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.

Namdeo Kumbhar

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी

Sangamner Accident News Today : शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. पहाटे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खासगी बस आणि आंब्याचा ट्रकचा अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात ते आठ जण गंभीर जखमी आहे. अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतेय. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर आज पहाटे खाजगी ट्रॅव्हल बस आणि आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्याशिवाय जखमींना रूग्णालयात उपचारासाठी त्यांनी दाखल केलेय. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल बस आणि समोरून येणाऱ्या ट्रकची पहाटे जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज प्रथमदर्शी व्यक्तीने व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

SCROLL FOR NEXT