शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक ! विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा झटका; टीव्ही, फ्रिज, मोबाईलसह शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक !

वीज कंपनींच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली - ऐन सणासुदीच्या काळात सांगली Sangali मध्ये वीज वितरण कंपनीच्या Power Distribution Company हाय व्हॉलटेजचा झटका सांगलीकर नागरिकांना बसला आहे. विजेच्या उच्च दाबामुळे टीव्ही TV, AC, फ्रीजसह Fridge अनेक लहान मोठे शेकडो विद्युत उपकरण जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असले तरी वीज कंपनींच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. (Burned hundreds of electrical appliances, including TVs, refrigerators, and mobiles)

हे देखील पहा -

देशात सध्या विजेचं संकट निर्माण झालेला आहे. मात्र सांगलीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात वीज वितरण कंपनीच्या झटक्याने ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत. सांगलीच्या गणेशनगर मध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामूळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुपारच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढल्यामुळे शेकडो घरातील टीव्ही, फ्रीज ,मोबाईल अशी अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत.

अचानकपणे एकाच वेळी तब्बल 500 ते 600 ग्राहकांना याचा फटका बसल्याने. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि एमएसीबीच्या MSCB अधिकाऱ्यांना बोलावून सदर घटना निदर्शनास आणून दिली तसेच तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर वीज वितरण विभागाकडून नुकसान झालेल्या ग्राहकांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT