bullock cart race saam tv
महाराष्ट्र

Bullock Cart Race : निलेश चव्हाण, आदेश पाटलांच्या बैलगाडीनं मारलं मैदान

बैलगाडी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : महाड पोलादपुर बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे माजी अध्यक्ष (कै.) सुभाष खांबे यांच्या स्मरणार्थ आज (रविवार) महाड (mahad) तालुक्यातील काचले या गावी बैलगाडी स्पर्धांचे (bullock cart race) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ३६ बैलगाडी मालकांनी सहभग घेतला. (bullock cart race latest marathi news)

या स्पर्धेत निलेश चव्हाण, तेलंगे यांच्या बैलगाडीचा प्रथम क्रमांक, आदेश पाटील, मोहोप्रे यांचा द्वितीय क्रमांक तसेच श्री क्षेत्र स्वयंभू प्रतिष्ठान, वरंधचा तृतीय, महेश जाधव, भावे यांच्या बैलगाडीचा चतुर्थ क्रमांक आला. बैलगाडीच्या या स्पर्धांवर गेली सात वर्ष बंदी होती. ही बंदी उठल्यानंतर आता स्पर्धा सुरु झाल्या आहेत. बैलगाडी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी शर्यतप्रेमींनी (sports) मोठी गर्दी केली होती.

या स्पर्धांना परवानगी देताना ५० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. त्याच बरोबर परवानगी जिल्हा पातळीवरून दिली जाते. या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आयोजकांनी केली आहे. याबाबत आयोजकांच्यावतीने सचिन ओझर्डे म्हणाले काही जाचक अटींमुळे स्पर्धा आयाेजनात अडचणी येताहेत. राज्य शासनाने (maharashtra government) जाचक अटी दूर करावेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol: नारळाच्या दुधामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? कोलेस्टेरॉलवरही होतो 'हा' परिणाम, जाणून घ्या सत्य

Bigg Boss Marathi 6: 'तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही...'; प्राजक्ता-अनुश्रीची कॅट फाईट, प्रोमो व्हायरल

Valentine Special : व्हॅलेंटाइन स्पेशल घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट्स, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड

Shocking : शाळेत भयंकर घडलं, विद्यार्थिनीला अंगावर वळ उमटेपर्यंत अमानुष मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT