सांगली : बुलेट-कार अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू  SaamTvNews
महाराष्ट्र

मिरज-पंढरपूर महामार्गावर बुलेट-कारचा अपघात; पोलिस जागीच ठार!

अपघातात प्रवीण बाबाराम सोनवणे (वय ४३) या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर (Miraj Pandharpur Highway) चारचाकी आणि बुलेट अपघातात (Accident) बुलेटस्वार पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या भीषण अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. महामार्गावरील शिरढोन जवळ हा अपघात झाला आहे.

हे देखील पहा :

कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) येथील चार चाकी वाहनाची बुलेट (Bullet) मोटरसायकलला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात प्रवीण बाबाराम सोनवणे (वय ४३) या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.

प्रवीण सोनवणे हे बुलेट मोटरसायकलवरून सांगोल्याहून (Sangola) सांगलीकडे (Sangli) निघाले होते. तर चार चाकी वाहन मिरज हून सोलापूर कडे निघाले होते. दरम्यान, उत्तम सिमेंट कारखाना जवळ असलेल्या पुलावर आले असता समोरून येणाऱ्या बुलेट मोटर सायकलला चारचाकी वाहनांची जोराची धडक बसली. यात प्रवीण सोनवणे यांना डोक्याला आणि पायाला जोराचा मार लागल्याने जागीच ठार झाले. तर, जखमींवर कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

SCROLL FOR NEXT