Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: बुलेट व दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; टोळीचे मराठवाड्यात नेटवर्क

विनोद जिरे

बीड - नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना (Beed Police) यश आले आहे. यात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून टोळीकडून तब्बल पाच बुलेट, एक पल्सर आणि एक एचएफ डिलक्स अशा 7 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी चोरांच्या टोळीचे नेटवर्क संपूर्ण मराठवाडाभर (Marathwada) असल्याचे पोलीस (Police) तपासात उघड झाले आहे. यामुळे अनेक गुन्हे समोर येणार आहेत. यातच बीड (Beed) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

हे देखील पहा -

यात बुलेट गाड्याच्या चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या, गेवराई पोलीस ठाण्याचे डिबी पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, पाच बुलेट आणि इतर दोन दुचाकी मिळून आल्या. या 7 दुचाकीसह आरोपी सोमनाथ रामदास खटाले ( वय २८ , रा . खटालेवाडी ता.आष्टी जि.बीड ) व संदिप दिलीप कदम ( वय २७ , रा . डोंगरगाव ता . जि . अहमदनगर ) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीला अटक केल्यामुळे अनेक चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT