Nagpur Saam
महाराष्ट्र

Nagpur violence : नागपूर हिंसाचार मास्टरमाईंडच्या घरावर बुलडोझर? प्रशासनाची नोटीस धडकली

Nagpur violence News Update : नागपूर हिंसाचारानंतर अटकेत असणाऱ्या फहीम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. आता नागपूर मनपाकडूनही कारवाईला वेग आलाय.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खान याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येऊ शकतो. कारण फहीम खान याचं घर बांधनाता अनाधिकृत बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. नागपूर महानगरपालिकेकडून फहीमच्या घरी नोटीस पाठवण्यात आले आहे. नागपूर शहरात लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहिम खानवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. त्यात आता त्याच्या घरावर कारवाई केली जाणार असल्याचे समोर आले आहे.

१७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी नागपुरात हिंसाचार झालेल्या घटनेतील आरोप असणाऱ्या फहीमच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची चर्चा नागपूरमध्ये सुरू आहे. यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत राहणारा फहीम खान यांनी घर बांधताना अनधिकृत बांधकाम केल्यानं मनपा प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. फहीम खान ह्याने घराजवळ सुमारे 900 चौरस फुटाचे बांधकाम अनधिकृत बांधकाम केल्यानं महानगरपालिकेने नोटीस बजावली असून कारवाई होणार असल्याचं बोलल जात आहे.

सायबर पोलिसांची करडी नजर-

नागपुरातील झालेल्य हिंसाचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट आणि रील्सवर सायबर विभागाकडून मॉनिटरिंग केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलीस यांनी सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकवणाऱ्या रील्स पोस्ट केल्याप्रमाणे आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहे.

आणखी तीन जणांवर गुन्हे दाखल

पारशिवनी येथील रवींद्र सदाशिव बर्वे यांनी फेसबुकवर हिंदू समाजातील धर्म ग्रंथाबाबत विवादास्पद धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट टाकली होती. यासाठी पारशिवनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेच हर्षल गणेश ऑस्करकर यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेब बाबत विवादास्पद स्टोरी स्टेटस ठेवल्यामुळे काटोल येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शनिवारी सुद्धा काटोल येथील दिव्यम बैस नामक 23 वर्षीय तरुणावर औरंगजेबबाबत धार्मिक भावना दुखवणारी रील पोस्ट केल्यानं गुन्हा नोंदवला होता. आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT