Buldhana The death of Sanskar Sontakke  Saam Tv News
महाराष्ट्र

Buldhana News : बुलढाण्यातील संस्कार सोनटक्केचा मृत्यू उम्षाघाताने नव्हे तर...; वैद्यकीय अहवालातून वेगळच कारण समोर

Buldhana School Student Death : शेगावातील त्या विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. अकोला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Prashant Patil

बुलढाणा : वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत असून कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, येथील शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं वृत्त सकाळी समोर आलं होतं. अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना संस्कार सोनटक्के याच्या मृत्यूबाबत कळवण्यात आलं होत. त्यानंतर, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, या १२ वर्षीय संस्कार सोनटक्केचा मृत्यू उष्माघातामुळे झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.

शेगावातील त्या विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. अकोला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संस्कार सोनटक्के या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू हा उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाला असल्याचं स्पष्टीकरण अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिलं आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील १२ वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे . शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं, तसंच उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी, असं आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनतेला केलं. दरम्यान, संस्कार सोनटक्के याचा मृत्यू उष्माघाताने झाला नसल्याचंही आता स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT