बिबी येथील जवान किशोर काळुसे अनंतात विलीन... संजय जाधव
महाराष्ट्र

बिबी येथील जवान किशोर काळुसे अनंतात विलीन...

सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथील जवान किशोर काळुसे यांच्यावर गुरुवारी 5 ऑगस्ट रोजी बिबी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथील जवान किशोर काळुसे यांच्यावर गुरुवारी 5 ऑगस्ट रोजी बिबी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांची तीन वर्षाची मुलगी सेजल व भाऊ नुतन काळुसे यांनी जवान किशोर काळुसे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली.

हे देखील पहा -

दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास किशोर काळुसे यांना अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये कर्तव्य बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान दि. 5 ऑगस्ट रोजी अहमदनगर येथील इंडियन आर्मीच्या वाहनाने त्यांचे पार्थिव दुपारी तीन वाजेच्या सुमारास बिबी येते आणण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करून महिलांनी पार्थिव जाण्याच्या मार्गावर व स्मशानभूमीत रांगोळी काढली होती. राहत्या घरून अंतयात्रा गावातील मुख्य रस्त्याने निघून नंतर बस स्टँड परिसरातून स्मशानभुमीत पोहचली. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. किशोर यांच्या पार्थिव ठेवलेल्या रथावर चहुबाजूने पुष्पवर्षाव होत होता.

पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर अहमदनगर येथील आर्मीच्या अधिकाऱ्यांनी जवान किशोर काळुसे यांना सलामी दिली. यावेळी परिसरातील सर्वच पक्षाचे नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक व बीबी परिसरातील नागरिक व महिलामंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. किशोर यांच्या पार्थिवास अग्नी दिल्यानंतर स्मशानभूमी परिसर "शहीद जवान अमर रहे" च्या घोषणानी दणाणून गेला होता. आलेल्या सर्व मान्यवरांनी किशोर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेतले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT