Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती अन् लैंगिक अत्याचार; सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ..पती, सासू, नणंद अटकेत

Woman Brutalized by In-Laws: बुलढाण्यात ३२ वर्षीय विवाहितेवर वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती व नकार दिल्यानंतर बलात्कार; तीन आरोपी अटकेत, पाचजण फरार, पोलीस तपास सुरू; जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील विवाहितेंच्या छळाच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून वेश्याव्यवसायात ढकण्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेने नकार दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार करत २ दिवस घरात डांबून ठेवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

३२ वर्षीय विवाहित महिला बुलढाण्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला पती, सासू आणि नणंद मिळून विवाहित महिलेचा छळ करत होते. आर्थिक फायद्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. महिलेनं नकार दिल्यानंतर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरूवात केली.

पती आणि नणंदेच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. दोन दिवस डांबून ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेनं जानेफळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत असून, याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT