Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारने घेतला पेट, तिघांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारने घेतला पेट, तिघांचा होरपळून मृत्यू

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News: समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजही समृद्धी महामार्गवर एक भीषण अपघात झाला आहे. बुलडाणा येथील देऊळगाव कोळ गावाजवळ हा अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार इम्पॅक्ट बॅरियरला धडकून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. अपघातानंतर कारने पेट घेतला. अपघातात दोघांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला तर तिसरा प्रवासी मध्यप्रदेशातील शजापुर येथील रहिवासी असलेला दिनेश भीलाला याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या अपघातातील घटनास्थळी मृत्यू झालेल्या दोघा मृतकांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर तिसरा मृतक दिनेश भिलाला याचे नातेवाईक मध्यप्रदेशातून आल्यावर इतर दोघे त्यांच्या ओळखीचे होते का, याचा खुलासा होणार आहे. यात डिझेल चोरीच्या टोळीचा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  (Buldhana News)

अपघात एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू

दरम्यान 22 मे रोजी तेलंगाना येथील काकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम आटोपून सुरतकडे जाणाऱ्या भावंडांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला. यात एकाच कुटुंबातील चार भावंडांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी (Samruddhi Mahamarg) दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मैत्री- व्यापार ते युक्रेन वॉर; अनेक करारांवर चर्चा, पीएम मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: TET सक्ती विरोधात जालन्यात शिक्षक आक्रमक

Shocking : हृदयद्रावक! कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागला; बापलेकीचा जागीच मृत्यू

भारत-रशिया संबंधांना नवी गती; आरोग्य-शिक्षणासह अनेक निर्णायक करार|VIDEO

SCROLL FOR NEXT