buldhana police issues rules and regulations for mangal karyalaya Saam Tv
महाराष्ट्र

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Buldhana Police News : बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांनी सूचना पाळाव्यात असे आवाहन केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामाेरे जावे लागले असा इशारा दिला आहे.

संजय जाधव

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने नुकताच डीजे वाजविण्यावर बंदी असल्याचा आदेश पारित केला आहे. या आदेशाची पालन न झाल्यास कडक कारवाईचे संकेत पाेलिस प्रशासनाने दिले आहेत. आता त्यापूढे जाऊन पाेलिसांनी मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापकांची बैठक घेत नवी नियमावली जारी केली आहे. (Maharashtra News)

बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात शहरातील मंगल कार्यालय मालकांची नुकतीच बैठक पार पडली. लग्न समारंभात, तसेच इतर कार्यक्रमाच्या दरम्यान डीजे तसेच वाद्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या होते. शिवाय तणावाची परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मंगल कार्यालय प्रशासनाला पाेलिसांनी काही सक्त सूचना केल्या आहेत.

अशा आहेत पाेलिसांच्या सूचना

पार्किंग व्यवस्था करणे.

सिसिटीव्ही यंत्रणा लावणे.

मंगल कार्यालंय बुक करण्यास आलेल्यांना पोलिसांची डीजे परवानगी असल्याची खात्री करून घेणे.

मंगल कार्याल्यातील आवारात एका बाजूने डीजे वाजविण्याची व्यवस्था करणे.

नियमानुसार आवाजात डीजे वाजविणे.

सूचनांचे पालन व्हावे अन्यथा...

अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी या सूचना जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स चालक मालकांसाठी देण्यात आल्याचे सांगितले. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामाेरे जावे लागले असा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरुड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांची उपस्थिती होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT