Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; दुसरबीड ग्रामपंचायतीवर काढला हंडा मोर्चा

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. ठिकठिकाणी टँकर लावले जात असून काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत

संजय जाधव

बुलढाणा : पाणी टंचाईची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. यात पाणी टंचाईमुळे दुसरबीड येथील नागरिकांचे हाल होत आहेत. (Buldhana) पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. 

बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. ठिकठिकाणी टँकर लावले जात असून काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सिंदखेडराजा (Sindkhedraja) तालुक्यातील दुसरबीड येथे पाणी पुरवठा करणारे तलाव आटले आहेत. यामुळे गावातील पाणी पुरवठा (Water Supply) ठप्प झाला आहे. पाण्यासाठी महिलांना वन वन भटकावे लागत आहे. पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचातीकडे (Gram Panchayat) मागणी केली होती. असे असताना देखील येथे अद्याप उपाययोजना झाली नाही.   

पाण्यासाठी मोर्चा काढत घोषणाबाजी 

गावात पाणी पुरवठा करण्याबाबत उपाययोजना करावी; अशी मागणी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान पाण्याचे टँकर मंजुरीसाठी ९ मे रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील संतप्त ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीवर् हंडा मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी केली. यावेळी पाणी द्या पाणी द्या,  जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो; अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका मुख्य सभेत पाणी प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक

Women Weight Loss: महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT