Buldhana Chikhali Taluka News Saam Tv
महाराष्ट्र

Chikhali News : शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी तलावावर गेले, परतलेच नाही; चिमुकल्यांच्या मृत्युने अख्खं गाव हळहळलं

खोल पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Chikhali Taluka News : सकाळची शाळा करून घरी परतल्यानंतर १० वर्षीय चिमुकल्यांनी जेवण केले. नंतर पोहण्याचा मोह झाल्याने दोघेही गाव शिवारातील तलावावर गेले. मात्र, खोल पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

ही दुर्देवी घटना बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यात २८ फेब्रुवारीला घडली. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत. सायंकाळी जनावरे पाणी पाजण्यासाठी शेतकरी तलवावर गेल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थानी तत्काळ तलावात शोध घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं चिखली तालुक्यातील करवंड गाव हळहळलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिकेत चौथीत तर आदित्य हा पाचव्या वर्गात शिकत होता. दोघे मित्र २८ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या धरणात पोहायला गेले होते. अनिकेतला पोहायला येत होते मात्र आदित्यला पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा धरणात गाळात फसल्यामुळे बुडून दुर्दैवी अंत झाला.

संध्याकाळी गावातील शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला होते. त्यांना तलावाच्या काठावर मुलांचे चपला व कपडे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. पाठोपाठ धरणावर गर्दी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

गावातीलच शालीग्राम गवई यांनी पाण्यात उतरून शोध घेतला. त्यांच्या पायाला मुलांचे डोके लागले. त्यामुळे दोन्ही मुले गाळात फसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांच्या मदतीने अनिकेत आणि आदित्यचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT