Jalgaon Jamod Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: मुले चोरणारी महिला समजून तृतीय पंथियाला जमावाची बेदम मारहाण...

तृतीयपंथियाच्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल; पाच अटकेत, तीन फरार

संजय जाधव

बुलढाणा - मुलं चोरणारी महिला समजून जमावाने एका तृतीय पंथीयला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील (Buldhana) जळगाव जामोद (Jalgaon Jamod) येथे घडली आहे. आता या तृतीय पंथियाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर ३ आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

जळगाव जामोद येथे काल सायंकाळी लहान मुले चोरणारी महिला समजून एका तृतीय पंथीयाला जमावाने बेदम मारहाण केली. सायरा नावाची तृतीय पंथीय अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूर कडे परत जात असताना जळगाव जामोद येथील जुना बस स्टँड परिसरात जमावाने मुले चोरणारी टोळी समजून या तृतीयपंथीयाला बेदम मारहाण केली.

हे देखील पाहा -

या तृतीयपंथीयाला मारहाण करत जमावाने पोलीस स्टेशनमध्ये नेलं. चौकशी केली असता सायरा नावाची ही तृतीय पंथीय मलकापूर येथील असून ती आकोट येथून मलकापूर कडे जात असताना हा प्रकार घडला .आता या तृतीय पंथीयाने जळगाव जामोद पोलिसात तक्रार दिली आहे व मारहाण करणाऱ्या जमावा विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जळगाव जामोद पोलिसांनी आतापर्यंत व्हिडिओत दिसणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं असून इतर मारहाण करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सायराला बेदम मारहाण केल्यामुळे तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान जळगाव जामोद येथे तृतीय पंथीयाला जमावाने मारहाण केली. मुले पळवणारी बाई म्हणून तृतीय पंथीला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा तृतीय पंथीयाचे नेते मोगराबाई किन्नर यांनी निषेध केला आहे . पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीय पंथीय याचा निषेध करत जळगाव जामोद येथे जमतील व या जमावाला धडा शिकवेल असाही इशारा तृतीय पंथीय यांचे नेते मोगराबाई किन्नर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT