Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात, भरधाव दुचाकी एसटी बसला धडकली; तिघांचा जागीच मृत्यू

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या वरदडा फाट्यावर मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली. मृत तरुण हे चिखली तालुक्यातील रहिवासी होते.

गोपाल सुरडकर, धनंजय ठेंग, सुनील सोनुने अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. घटनेचा पंचनामा करून तिन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन तरणीबांड पोरांचा अपघातात मृत्यू झाल्याने चिखली तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यात राहणारे तीन तरुण काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा ते चिखली ते मेहकर मार्गावरून दुचाकीने प्रवास करीत होते. त्याचवेळी वरदडा फाट्यावर एसटी बस बंद पडलेल्या अवस्थेत उभी होती.

दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणांना रात्रीच्या अंधारात एसटी बस दिसली नाही. त्यामुळे काही समजण्याच्या आतच दुचाकी एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जळगावात शिवशाही बस-कारचा भीषण अपघात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा धरणगाव रस्त्यावर शिवशाही बस आणि कारचा भीषण अपघात झाला. सूतगिरणी जवळ सोमवारी रात्री शिवशाही बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेले धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या निजामपूर येथील असल्याची माहिती. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : भारताविरोधात किवीच्या संघाची घोषणा, पहिल्या सामन्याला विल्यमसन मुकणार, कुणाला मिळाली संधी?

UPI Transaction Limit : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना मोठा दिलासा; आरबीआयने वाढवली UPI Lite पेमेंटची मर्यादा

Marathi News Live Updates: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Cancer: मृत्यूचा धोका टाळणाऱ्या ४ ब्लड टेस्ट; कॅन्सरला प्राथमिक टप्प्यात शोधून काढतील!

Tourism Places: मुबंईमधील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहून मूड होईल मिनिटांत फ्रेश

SCROLL FOR NEXT