Buldhana Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा वाढला; ४ प्रवाशांची ओळख पटली

Buldhana Samruddhi Mahamarg Accident: या बसमधून वर्ध्यामधील १४, नागपूरमधील ८ आणि यवतमाळचे ३ प्रवाशी प्रवास करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. यातील अवंती पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, आणि श्रेया वंजारी या ४ मृतांची ओळख पटली आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Samruddhi Highway Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसचे समोरील टायर फुटल्याने बस अनियंत्रत होऊन उलटली. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागली.

या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता, की बसमधील प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. दरम्यान, मृतांपैकी चार प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या बसमधून वर्ध्यामधील १४, नागपूरमधील ८ आणि यवतमाळचे ३ प्रवाशी प्रवास करीत होते, अशी माहिती समोर आली आहे. यातील अवंती पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, आणि श्रेया वंजारी या ४ मृतांची ओळख पटली आहे. हे चारही जण वर्धा येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. अद्यापही अन्य मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातात प्रवाशांच्या मृतदेहाचा कोळसा झाल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे.

तर जखमी प्रवाशांमध्ये चालक शेख दानीश शेख इस्माईल (रा. दारव्हा जि. यवतमाळ), क्लिनर संदिप मारोती राठोड (वय ३१, रा. तिवसा), योगेश रामराव गवई (रा. औरंगाबाद), साईनाथ धरमसिंग पवार (वय १९ रा. माहूर), शशिकांत रामकृष्ण गजभिये ( रा. पांढरकवडा यवतमाळ), पंकज रमेशचंद्र ( रा. जिल्हा कांगडा, हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. इतर दोन जखमी प्रवाशीचे नाव कळू शकले नाही.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर तातडीने उपचार करा, असे आदेश सुद्धा त्यांनी दिले असून जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केली.

शरद पवार यांनी केला शोक व्यक्त

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. "बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना", असं ट्विट शरद पवार यांनी केलं.

"या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते", असंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT