Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशाची सुटका; तीन जणांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशाची सुटका; तीन जणांवर गुन्हा दाखल

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाण्यातील मिल्लतनगर भागात गोवंशाची जनावरे वाड्यात कोंबून ठेवल्याची माहिती (Buldhana) पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी (Police) केलेल्या कारवाईत ३७ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील मिळाली पारपेठ भागातील मिल्लतनगर येथील एका वाड्यामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी कोंबुन ठेवले होते. त्याची गोपनीय माहिती ठाणेदार रत्नपारखी यांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर वाड्यामध्ये एकुण ३७ गोवंश जनावरे निर्दयतेने जखडून बांधलेल्या कोंबलेल्या स्थितीत दिसुन आले. यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. 

साडेतीन लाखाची गोवंश 

ही जनावरे त्यांची असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसल्याने पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका करून त्यांना श्रीहरी गोशाळा बेलाड येथे ठेवण्यात आले आहे, तर सैय्यद अजगर सैय्यद रहेमान, सैय्यद सिकंदर सैय्यद रहेमान आणि सैय्यद फारुख सैय्यद रहेमान या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT