सागर निकवाडे
नंदूरबार : सातपुड्याच्या डोंगर रागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली असून याकडे प्रशासन आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे समोर येत आहे. यात सातपुडा (satpuda) पर्वत रांगांमध्ये कुठे रस्ते खचले आहेत, तर कुठे दरड कोसळल्याने (Nandurbar) त्याचे ढीग रस्त्यावर पडून आहेत. यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. (Latest Marathi News)
अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील अनेक घाट रस्त्यांमध्ये रस्ते खचले आहेत. तर काही ठिकाणी दरडचे ढीग रस्त्यावर पडले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या अवघड रस्त्यातून धोकेदायक पद्धतीने वाहनधारकांना जीव (Rain) मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातीलही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केले आहे.
पावसाळ्यात खचलेल्या (Akkakuwa) रस्त्यामुळे मार्ग काढतांना कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे दरडचे ढीग असल्याने रस्ताच नाही. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती होऊन रस्त्यावर पडलेल्या दरडचे मलबे हटवण्याची मागणी करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.