Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : तक्रार केली म्हणून रेशन दुकानदार पोहचला लाभार्थ्यांच्या घरी; केले धक्कादायक कृत्य

Buldhana News : गावातील रेशन दुकानदार दर महिन्याला निर्धारित धान्य देत नसून कमी धान्य देत असतो. याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर महाजन या ग्राहकाने तहसीलदारांना पुराव्यानिशी केली

संजय जाधव

बुलढाणा : रेशन दुकानदारांबाबत अनेकदा तक्रारी येत असतात. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या रेशन दुकानदारांची मुजोरी वाढत असते. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. दुकानदाराबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्याने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दुकानदाराने त्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. 

बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी या गावातील हा प्रकार आहे. या गावातील रेशन दुकानदार दर महिन्याला निर्धारित धान्य देत नसून कमी धान्य देत असतो. याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर महाजन या ग्राहकाने तहसीलदारांना पुराव्यानिशी केली. तक्रार केल्याचा राग आल्याने रेशन दुकानदाराने या ग्राहकाला घरी जाऊन मारहाण केली. याप्रकरणी ग्राहकाने (Sindkhedraja) सिंदखेड राजा पोलिसात तक्रार केली. यावरून पोलिसांनी रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हाही दाखल केला. मात्र संबंधित सिंदखेड राजा तहसीलदारांनी याप्रकरणी रेशन दुकानदारावर कुठलीही कारवाई न करता अभय दिले आहे.

गावातील अनेकांच्या तक्रारी 

अशा प्रकारची (Crime news) अरेरावी या रेशन दुकानदाराने गावातील अनेक नागरिकांसोबत केली आहे. गावातील नागरिकांना कमी धान्य देऊन उर्वरित धान्य काळ्या बाजारात विक्री करत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी ही केली आहे. मात्र या रेशन दुकानदारावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राज्यभरात आज प्रचाराचा सुपर संडे

Viral Video: एकीकडे तरुणींची जोरदार कुटाकुटी, दुसरीकडे काका फक्त पाहतच राहिले; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Tamannaah Bhatia: तमन्नाच्या अदा पाहून पोरं झाली फिदा

Priyanka Gandhi : गाडीचे सारथ्य करणाऱ्या तरुणासाठी प्रियंका गांधी विमानतळावर थांबल्या; फोटो काढला अन् झाल्या मार्गस्थ

Laxman Hake : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून पळ का काढला? लक्ष्मण हाकेंचा सवाल

SCROLL FOR NEXT