Buldhana  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: 'बाळाच्या पोटात बाळ' दुर्मिळ घटनेतील महिलेची सुरक्षित प्रसुती, दोघांचीही प्रकृती स्थिर

Buldhana Rare 'Fetus in Fetu' Case: बुलडाण्यातील एका महिलेच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाच्या पोटात बाळ असल्याची घटना समोर आली होती. सोनोग्राफी केल्यानंतर ही घटना उघड झाली होती. नुकताच या महिलेची प्रसुती झाली असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. या दुर्मिळ घटनेतील महिलेची सुरक्षित प्रसुती झाली. बुलडाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसुती करण्यात आली. महिला आणि तिचे बाळ यांची प्रकृती स्थिर आहे. बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात अशी ही दुर्मिळ घटना घडली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील एका महिलेच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाच्या पोटात बाळ असल्याची घटना समोर आली होती. बाळाच्या पोटात बाळ दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची सुरक्षित प्रसुती झाली आहे. बुलडाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसुती करण्यात आली असून दोघांची प्रकृती चांगली आहे. आता बाळाच्या पोटातही बाळ असल्याने पुढील उपचारासाठी बाळासह महिलेला अमरावती येथील रुग्णलयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने समाधान व्यक्त केले.

या दुर्मिळ परिस्थितीला वैद्यकीय भाषेत फिटस इन फेटू असं म्हटलं जातं. साधारणतः पाच लाख सामान्य गर्भवती महिलांत अशा प्रकारची एखादी घटना बघायला मिळते. बुलडाणा जिल्हा महिला रुग्णालयामध्ये ही ३२ वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासून महिलेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. सोनोग्राफी केल्यानंतर या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात दुसरं बाळ असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असणं या परिस्थितीला फिटस इन फिटो असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त २०० तर आपल्या देशात ९ ते १० अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलडाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

SCROLL FOR NEXT