Buldhana Takkal Virus : बुलढाणा केस गळती प्रकरण; संशयाची सुई आता रेशनच्या धान्याकडे?, गोडाऊनमधील धान्याची उचल थांबविली

Buldhana News : स्थानिक आरोग्य प्रशासनापासून ते देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात ICMR ने येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते
Buldhana Takkal Virus
Buldhana Takkal VirusSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे संपूर्ण खळबळ उडाली होती. मात्र केस गळती नेमकी कोणत्या कारणामुळे होत आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आता केस गळती रेशन धान्यामुळे होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने खामगाव येथील गोडाऊनमधील धान्याची उचल थांबविण्यात आली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास १५ गावांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडण्याचा प्रकार घडत आहे. स्थानिक आरोग्य प्रशासनापासून ते देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात ICMR ने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते. मात्र अनेक दिवस होऊनही केस गळतीच्या कारणांचा शोध लागलेला नाही. 

Buldhana Takkal Virus
Fraud Case : पैसे डबल करून देण्याचे सांगत दिली पेपरची रद्दी; अंबरनाथमधील प्रकार, तरुणाला ५० हजारांचा गंडा

सेलेनियमच्या अधिक प्रमाणामुळे गळतीचा अहवाल  

मात्र आता या सर्व प्रकरणाचा अभ्यास करून रुग्णांच्या रक्तात व केसात "सेलेनियम" या जड धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिक खाद्य म्हणून जो गहू वापरतात; त्या गव्हामध्येही सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याची माहिती आहे. या सेलेनियममुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे.

Buldhana Takkal Virus
Kalamb Nagar Parishad : बड्या थकबाकीदारांची नावे झळकणार डिजिटल बोर्डवर; वसुलीसाठी कळंब नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवर

नमुने घेऊन पथक दिल्लीला रवाना 

याच अनुषंगाने केंद्राचं एक विशेष पथक गेल्या तीन दिवसापासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणीसाठी आले आहे. दरम्यान खामगाव येथे असलेल्या या गोदामातील गहू, तांदूळ व इतर धान्याचे नमुने घेण्यात आले आहे. या बाबत कमालीची गोपनीयता पाळत हे पथक कालच दिल्लीला रवाना झाले आहे. या गोदामातील धान्य उचल ही या पथकाने थांबवली असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्रीय विशेष पथकाकडून या धान्य गोदामातून धान्य हे केस गळती संदर्भात तर नाही नेले ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत मात्र भारतीय खाद्य निगम व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र केस गळतीचा संबंध आता रेशनच्या धान्याची जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे व तसा संशय ही बळावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com