Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! विद्यार्थिनीला कक्षात बोलावून केले अश्लील चाळे; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्याधापक फरार आहे. पोलीस शोध घेत आहेत.

संजय जाधव

बुलढाणा - नांदुरा तालुक्यातील शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य मुख्यद्यापकाने केले. आपल्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाने कक्षात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. तिच्या शरीरावर वाईट उद्देशाने हात फिरवला तसेच कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. अखेर या वासनांध शिक्षका विरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देविदास डिगोळे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

हे देखील पाहा -

जानराव डीगोळे हा एका जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहे. पिडीत मुलगी त्याच शाळेत पाचव्या वर्गात शिकते. डीगोळे ने मुलीला त्याच्या खोलित बोलावले. तुझा अभ्यास पहायचा आहे, तू अभ्यास का केला नाही? तुला आता मी शिक्षा करणार असे डीगोळे मुलीला म्हणाला. त्यावर तिने घाबरून असे करू नका सर असे म्हटले असता तू शांत बस असे म्हणत वासनांध मास्तरने वाईट उद्देशाने मुलीच्या शरीरावरून हात फिरवला.

मुलीने असे करू नका सर असे म्हटले असता तू जर कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. शाळा सुटल्यावर पीडित मुलीने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्याधापक फरार आहे. पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : शिंदेसेनेच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक सोलापुरात, ४ ठिकाणी भाजपसोबत संघर्ष

Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Nagpur : शेतात कामाला जाताना कारने चिरडले, २ महिलांचा जागीच मृत्यू

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून या राशींचं नशीब चमकणार; शनीदेव मार्गी होऊन मिळवून देणार भरपूर पैसा

SCROLL FOR NEXT